News Flash

रायगड : २० संभाव्य दरडग्रस्त गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू

अलिबाग- रायगड जिल्ह्यात १० व ११ जून रोजी अतिवृष्टीची शक्यता

नागरिकांनी अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर पडणे टाळावे, जिल्हाधिकाऱ्यांनी केली सूचना

अलिबाग- रायगड जिल्ह्यात १० व ११ जून रोजी अतिवृष्टीची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावे आणि नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भुस्खलनाच्या छायेत असलेल्या २० गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे.

हवामान विभागाने १० जूनला रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर ११ जूनला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहे. जिल्ह्यात नदी, खाडी किनाऱ्यांवरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावे यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भुवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १०३ संभाव्य दरडग्रस्त गावे आहेत. यात २० गावांना भुस्खलनाचा तीव्र धोका असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. यापैकी २० गावातील नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.

इतर संभाव्य दरडग्रस्त गावांतील नागरिकांचे देखील गरज पडल्यास स्थलांतरण होणार –

म्हसळा तालुक्यातील वावा, आमशेत, महाड तालुक्यातील लोअर तुडील, टोळ खुर्द बौध्दवाडी, मोरेवाडी शिंगरकोंड, पातेरवाडी आंबिवली बुदृक, मुठावली, सोनघर, चांढवे खुर्द, रोहण, कोथेरी जंगमवाडी, खालापुर तालुक्यातील सुभाष नगर, कर्जत तालुक्यातील मुद्रे बुदृक, श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडले, पोलादपूर तालुक्यातील कोंढवी माराठवाडी, कोतवाली खुर्द, रोहा तालुक्यातील तीसे आणि वाळुंजवाडी या गावांचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांत या गावांमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जाणार आहे. या शिवाय इतर संभाव्य दरडग्रस्त गावांतील नागरिकांना देखील तेथील परिस्थिती बघून गरज पडल्यास स्थलांतरीत केले जाणार आहे.

आपत्ती निवारण कक्ष २४ तास सुरू ठेवण्याच्या सूचना –

नदीकिनाऱ्यांवरील गावांना सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गरज पडल्यास त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार आहे. सर्व तालुक्यात आपत्ती निवारण कक्ष २४ तास कार्यान्वयीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते वाहतुक, वीज पुरवठा, पाणी पुरवठा बाधित होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालिन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केलं सतर्कतेचं आवाहन –

“नागरिकांनी अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर पडणे टाळावे, सुरक्षित स्थळी स्थलरांतरीत व्हावे, प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करावे, या कालावधीत समुद्र किनाऱ्यावर अथवा नदीत पोहण्यासाठी जाण्याचचे धाडस करू नये, आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधावा.” असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 2:32 pm

Web Title: raigad migration of citizens from 20 potentially affected villages begins msr 87
टॅग : Heavy Rain
Next Stories
1 सिंधुदूर्गात रेल्वेच्या डब्याला आग; दोन तासांनी आगीवर नियंत्रण
2 कोल्हापुरातील व्यापारी उतरले रस्त्यावर ; दुकाने उघडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन
3 माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन
Just Now!
X