कुवैतमध्ये तेल विहिरीवर कामाला असलेल्या रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ४७ वर्षीय व्यक्ती मार्चमध्ये कुवैतमधून घरी आली होती. परत जाण्यासाठी लस घेतली मात्र, तिला कुवैतमध्ये परवानगीच नसल्यानं मोठी समस्या निर्माण झाली. या नैराश्यातून सदरील व्यक्तीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सीरज मापकर (वय ४७) असं मयत व्यक्तीचं नाव आहे.

मापकर हे कुवैतमध्ये तेल विहिरीवर काम करतात. यावर्षी मार्च महिन्यात ते महाड येथील आपल्या घरी आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा कुवैतमध्ये कामावर जायचं होतं. पण, लसीकरण करणं आवश्यक असल्यानं त्यांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली. मात्र, कुवैतसह सौदी राष्ट्रांमध्ये कोव्हॅक्सिन लसीला परवानगी देण्यात आलेली नाही.

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’

कुवैतमध्ये कोव्हॅक्सिन लसीला परवानगी नसल्याची माहिती मिळाल्यापासून सीरज मापकर नाराज होते. कारण त्यांना पुन्हा कुवैतमध्ये जाण्यात अडथळा निर्माण झाला होता, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. या घटनेविषयी पोलिसानीही माहिती दिली. “कुवैतमध्ये जाता येणार नसल्याने ते नाराज झाले होते असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. कुवैतमध्ये परवानगी नसलेली लस घेतल्यानं त्यांना व्हिसा नाकारण्यात आला होता. इतकंच नाही, तर त्यांनी कुवैतमध्ये जाण्यासाठी कर्जही घेतलं होतं अशी माहिती कुटुंबियांनी दिली,” असं पोलिसांनी सांगितलं.

याच नैराश्यातून मापकर यांनी घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोट सापडली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.