२५ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात यश

हर्षद कशाळकर, अलिबाग

The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?

वाढत्या नागरी करणाबरोबर रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. यात सायबर आणि आर्थिक फसवणुकींच्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसाठी चांगलेच आव्हानात्मक ठरत आहे. दरवर्षी दाखल होणाऱ्या एकूण गुन्ह्यांच्या तुलनेत २५ टक्केच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश येत आहे. सायबर पोलीस ठाणी ही नावापुरतीच ठरत आहेत.

जिल्ह्यात २०१६ मध्ये ५४ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. यातील १३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. २०१७ मध्ये ५१ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले. यातील ११गुन्हे उघडकीस आले. २०१८ मध्ये ५३ सायबर गुन्हे नोंदविले गेले. यातील १२ गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना शक्य झाले. म्हणजेच सलग तीन वर्षे दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांपैकी २५ टक्के गुन्ह्यांची उकल करणे सायबर गुन्हे शाखेला शक्य झालेले नाही. ही परिस्थिती रायगड जिल्ह्यापुरती मर्यादित नाही. राज्यातही सायबर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण फारसे चांगले नाही.

राज्यभरात २०१७ मध्ये ४ हजार ३५ गुन्ह्यांची नोंद झाली. यापैकी १ हजार ८० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आहे. म्हणजेच इथेही सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक नाही. ही एक चिंतेची बाब आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढत आहे. त्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल होताना दिसत नाही. त्यामुळे सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यभरात सुरू करण्यात आलेली ४७ सायबर पोलीस ठाणी कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

जगभरात सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे. तपासातील गुंतागुंत आणि क्लिष्टता यामुळे या गुन्ह्यांचा तपास आव्हानात्मक ठरत आहे. तपासासाठी तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यास कारणीभूत ठरत आहे. वास्तविक पाहता या विभागात कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तांत्रिक विभागाशी निगडित असणे गरजेचे आहे. त्यांना संगणकशास्त्र आणि मोबाइल टेलिकम्युनिकेशन प्रणालीचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. क्रिप्टोग्राफी, नेटवर्क फॉरेन्सिक, मोबाइल डाटा फॉरेन्सिक, हॅकिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, विविध प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स, फायरवॉल तंत्रज्ञान याचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणाऱ्या व्यक्तींचीच या विभागात नियुक्ती करणे गरजेचे आहे. पण सध्या पोलीस दलात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच प्रशिक्षण देऊन तपासाची जबाबदारी सोपविली जात आहे. हे देखील सायबर गुन्ह्यांची उकल न होण्यामागचे मुळं कारण आहे. या गुन्ह्यांच्या तपासातील मर्यादा लक्षात घेऊन नागरिकांनी सायबर गुन्ह्यापासून सतर्क राहणे गरजेचे आहे.

कशी होते फसवणूक

तुम्हाला ५ मिलियन डॉलरची लॉटरी लागली, आपले बँक खात्याचे एटीएम डेबिट कार्ड बंद करण्यात आले, आयकर विभागातून फोन करत आहेत, तुमच्या खात्यातील रकमेची माहिती हवी आहे, विमा कंपनीतून बोलत आहोत. तुमचे खात्यातील डिटेल्स हवे आहेत. ओटीपी आलाय तो सांगा अशा प्रकारचे संदेश आणि फोन कॉल्स करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याशिवाय एटीएम कार्ड स्कॅनर आणि मोबाइल सिम स्वॅपिंग पद्धतीचा अवलंब करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

खबरदारी बाळगणे गरजेचे

एटीएम पिन, ओटीपी कोणासोबतही शेअर करून नका, बँक खात्याचे डिटेल्स देऊ नका, निर्मनुष्य भागातील एटीएमचा वापर टाळा, बँकेच्या शाखेतील एटीएम केंद्रांचा वापर करा, संशयास्पद फोन कॉल्सला आणि संदेशांना उत्तर देऊ नका, िलक्सचा वापर करून बँकेची साइट उघडण्याचा प्रयत्न करू नका. आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका असे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी केले जात आहे, पण तरीदेखील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण घटताना दिसून येत नाही.