रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. बुधवार संध्याकाळपासूनच रायगडावर वेगवेगळया कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाल्यानंतर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमध्ये तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा भव्य आगमन सोहळा होईल.

Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
kolhapur marathi news, mahavikas aghadi marathi news
“परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून करूया”, शाहू छत्रपती यांची साद
( Accident near Ambajogai Waghala Pati in Beed )
अपघातात नियोजित नवरदेवासह बहीण, भाची ठार; मृत रेणापूरजवळचे, अंबाजोगाईनजीकची दुर्घटना

शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीमही राबवली. रायगडावर बुधवारी झालेल्या कार्यक्रमांना संभाजीराजेंसमवेत पोलंड व चीन येथील प्रतिनीधी उपस्थित होते.