News Flash

रायगडमध्ये ‘शिवशाही’ला अपघात, ३१ प्रवासी जखमी

जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस दापोलीवरुन पुण्याकडे निघाली होती.

जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला असून या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस दापोलीवरुन पुण्याकडे निघाली होती.

शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दापोलीवरुन पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसला अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस पलटल्याने ३१ प्रवासी जखमी झाले. लोणेरे गावातील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ हा अपघात घडला. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दरम्यान, राज्य परिवहन  मंडळाच्या शिवशाही बसच्या अपघाताच्या घटना वाढत असून यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 12:54 pm

Web Title: raigad shivshahi bus accident near lonere 31 passengers injured
Next Stories
1 गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी नव्हे, पुणे महापालिकेने हटवला उल्लेख
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 अटल बिहारी वाजपेयी शस्त्रपूजक होते : गृहराज्यमंत्री अहिर
Just Now!
X