रायगड जिल्ह्यातील पाचाड रस्त्यावर पडलेली दरड काढण्यात आली असून पथक तळई दरड ग्रस्त भागात निघाले आहे. हेलिकॉप्टर काही वेळेत महाड मध्ये दाखल होऊन राजेवाडी आणि इतर परिसरातील पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यात येईल. लाडोली येथील आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

महाड तालुक्यात राजेवाडी गाव संपुर्ण पाण्याखाली गेले आहे. दरडीत घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी किंवा जीवित हानीची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. महाड MIDC कडे जाताना राजेवाडी गावातील प्रत्येक नागरिक घराच्या वरच्या बाजुस, ईमारतीच्या वरच्या बाजुस येऊन मदतीची प्रतिक्षा करीत आहे. परंतु सावित्री नदी किनाऱ्या लगत असलेल्या राजेवाडी गावाला सावित्री नदीच्या पुराने विळखा घातला आहे. महाड शहरातुन दोन किमी अतंरावर राजेवाडी गावाकडे मदत पोहचवणे अशक्य झाले आहे. पोलिसांचे पथक रायगड-महाड रवाना झाले आहे.