News Flash

रेल्वेचे अनेक ‘हेल्पलाइन’ क्रमांक आजपासून बंद

रेल्वेतर्फे प्रवाशांची सोय आणि तक्रारींसाठी ३० पेक्षा अधिक सहायता क्रमांक (हेल्पलाइन क्रमांक) उपलब्ध करुन देण्यात आले होते.

 

आता सर्व सुविधा ‘रेल मदत’अ‍ॅपच्या माध्यमातून

रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू असलेले अनेक हेल्पलाइन क्रमांक नवीन वर्षांच्या प्रारंभापासून बंद करण्यात येणार असून आता १३९ क्रमांक आणि ‘रेल मदत’ या अ‍ॅपच्या माध्यमातून विविध मदत किंवा तक्रारीसंदर्भात प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान मदत मागता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळच्या रेल्वे वाणिज्य विभागाने निवेदनाद्वारे दिली आहे.

रेल्वेतर्फे प्रवाशांची सोय आणि तक्रारींसाठी ३० पेक्षा अधिक सहायता क्रमांक (हेल्पलाइन क्रमांक) उपलब्ध करुन देण्यात आले होते. परंतु बहुतांश प्रवाशांना याबाबत योग्य माहिती नसल्यामुळे प्रवासी तक्रार करण्यापासून किंवा सुविधांपासून वंचित राहत असल्याचे आढळून आल्याने रेल्वेने टप्प्याटप्प्याने सर्व क्रमांक बंद करून केवळ १३९ हा क्रमांक आणि एक पोर्टल प्रवाशांच्या सेवेत आणण्याची तयारी केली आहे. यापूर्वी रेल्वेतर्फे सुरू करण्यात आलेल्या नंबरपैकी १३९ हा सहायता केंद्र क्रमांक सुरू राहणार असून याशिवाय नव्याने प्रवाशांच्या सेवेत सादर करण्यात येत असलेल्या‘रेल मदत’ या सहायता पोर्टलचा प्रवासी आपल्या सोयी सुविधांसाठी वापर करू शकणार आहेत. या दोन्ही सुविधांचा उपयोग प्रवाशांच्या सेवेमध्ये रेल्वेने १५ जुलै २०१९ पासून सुरू केला आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या माध्यमातून पोर्टल तयार करण्यात आले आहे.

याआधी रेल्वे गाडीमध्ये पाणी, वीज, उपचार, वातानुकुलित यंत्रणा आधी सुविधांच्या तRारीसाठी तसेच आरक्षण आणि गाडीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी १३९ या सहायता नंबरचा वापर केला जात होता. गाडीमधील सुरक्षाविषयक सहायतेसाठी १८२, तर लहान मुलांसंबंधी मदतीसाठी १०९८, रेल्वे अपघात झाल्यानंतर मदतीसाठी १०७२, धावत्या गाडीच्या डब्यातील स्वच्छतेसाठी ५८८८८, सावधानतेसाठी १५५२१०, सामान्य तक्रार नंबर १३८ सध्या सुरू असून यातील १३९, भोजन सेवा (१८००१११३२१), सामान्य तक्रार नंबर १३८, सावधानता (१५२२१०), दुर्घटना संरक्षण (१९७२), क्लिन माय कोच सुविधा (५८८८८/१३८), लघु संदेश (९७१७६३०९८२) हेल्पलाईन सुविधा, याशिवाय ‘कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टम सहायता पोर्टल’ हे सर्व टोल फ्री नंबर पोर्टल एक जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे.

प्रवाशांना कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी ‘रेल मदत’ या नावाने अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. या अ‍ॅपवर प्रवासी आपली कोणतीही तक्रार नोंदवू शकणार आहेत. तसेच या अ‍ॅपच्या माध्यमातून आलेली तक्रार त्वरित संबंधित विभागाकडे पोहचविण्यात येणार आहे. या अ‍ॅपमुळे प्रवाशांना सुविधा तर मिळेलच, तसेच त्यांच्या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण होऊ  शकणार आहे. याव्यतिरिक्त प्रवासी सुरक्षा सुविधेसह असलेला सहायता क्रमांक १८२ सुरू राहणार आहे. रेल्वे प्रवासी आणि ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:18 am

Web Title: railway help line number stop akp 94
Next Stories
1 उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही, भास्कर जाधव यांची खदखद
2 मोहिते पाटलांचा बारामतीला धक्का; सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा
3 आमदारकीचा राजीनामा देणार नाही-प्रकाश सोळंके
Just Now!
X