22 November 2019

News Flash

पटरी सोडून मालगाडीचे डबे फार्म हाऊसमध्ये, पाच लाखांचे नुकसान

लातूर रेल्वेस्थानकात मालगाडी थांबवली जाताना पाठीमागे घेण्याच्या प्रयत्नात शेजारच्या फार्म हाऊसमध्ये घुसली. यात सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

| July 1, 2014 01:55 am

लातूर रेल्वेस्थानकात मालगाडी थांबवली जाताना पाठीमागे घेण्याच्या प्रयत्नात शेजारच्या फार्म हाऊसमध्ये घुसली. यात सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. लातूर रेल्वेस्थानकावर आलेली मालगाडी पाठीमागे घेताना शेजारच्या त्रिवेणी फार्म हाऊसमध्ये घुसली. तेथील आंब्याचे झाड मोडले, भिंतीचे कुंपण तुटले व लॉनचेही मोठे नुकसान झाले. रेल्वे टपरी सोडून सुमारे तीन-चार डबे फार्म हाऊसमध्ये घुसले. फार्म हाऊसचे मालक गणेश देशमुख यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तक्रार नोंदवली.

First Published on July 1, 2014 1:55 am

Web Title: railway in farmhouse
टॅग Farm,Latur,Railway
Just Now!
X