25 September 2020

News Flash

देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा ११ जुलैपासून बेमुदत संप

नॅशनल जॉईंट कौन्सिल ऑफ अ‍ॅक्शन या विविध कामगार संघटनांच्या शिखर संघटनेच्या प्रतिनिधींची बठक दिल्लीत होणार

विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ जुलपासून देशभरातील रेल्वे कर्मचारी, अधिकारी बेमुदत संपावर जाणार असून रेल्वेचा चक्काजाम करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे एम्प्लॉईज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आंदोलनात देशभरातील सुमारे ३४ लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावाही संयोजकांनी केला.

सातवा वेतन आयोग रद्द करावा, रेल्वेसह कोणत्याही महत्त्वाच्या सरकारी उद्योग व प्रकल्पात विदेशी गुंतवणुकीला प्राधान्य देऊ नये, यासह अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ जुलपासून बेमुदत रेल्वे बंदची हाक दिली आहे. या बाबतचे निवेदन केंद्र सरकारला गतवर्षी नोव्हेंबरमध्ये देण्यात आले. त्यानंतर चार वेळा दिल्लीत बठका होऊनही कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही. एवढेच नव्हे तर सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत आम्ही सरकारचे लक्ष वेधले असता सरकारने इम्पोर्ट कमिटी स्थापन केली. त्यात विविध खात्यांचे केंद्रीय सचिवही होते. परंतु समितीने दिलेल्या अहवालालाही केंद्राने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे आता आमचा बेमुदत संप अटळ आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे ज्येष्ठ नेते ए. राजगोपाल, व्यंकटेश्वर यांनी दिली.

नॅशनल जॉईंट कौन्सिल ऑफ अ‍ॅक्शन या विविध कामगार संघटनांच्या शिखर संघटनेच्या प्रतिनिधींची बठक दिल्लीत होणार असून तीत आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत ४ जुलपासून या मागण्यांबाबत जनजागृती सप्ताह पाळणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. या वेळी राजेश शिंदे, प्रकाश हटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 12:23 am

Web Title: railway staff to start indefinite strike on july 11
Next Stories
1 नक्षल्यांनी मारहाण करून गावाबाहेर काढलेली कुटुंबे आजही बेघरच
2 आषाढी यात्रा कालावधीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई
3 विधान परिषद उपसभापती; काँग्रेसमधून तिघे इच्छुक
Just Now!
X