29 September 2020

News Flash

सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी

सांगली, मिरजसह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वळीव पावसाने हजेरी लावली. कुंडल, तासगाव मिरज तालुक्याच्या पूर्व भागात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस झाला तर वाळवा इस्लामपूर परिसरात आज

| April 12, 2015 03:30 am

सांगली, मिरजसह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वळीव पावसाने हजेरी लावली. कुंडल, तासगाव मिरज तालुक्याच्या पूर्व भागात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस झाला तर वाळवा इस्लामपूर परिसरात आज वळिवाने हजेरी लावल्याने हवेतील उष्मा कमी झाला आहे.
काल रात्रीही मिरज शहर परिसरात विजेच्या गडगडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारी रात्री मिरजेच्या मिरासाहेब दग्र्यासमोर असलेल्या नगारखान्यावर वीज कोसळली. यामुळे ऐतिहासिक इमारतीच्या कोपऱ्याला तडा गेला असून, आजूबाजूच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. फ्रीज, दूरदर्शन संच जळाले.
आज दिवसभर ढगांची गर्दी होती. सायंकाळी चार नंतर पावसाळी वातावरण तयार झाले. सांगली, मिरज शहरासह तासगाव, कुंडल, तासगाव, कवठे महांकाळ परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे हवेतील उष्णता कमी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 3:30 am

Web Title: rain in sangli district
Next Stories
1 जिल्ह्य़ात पुन्हा ‘अवकाळी’चा फेरा
2 भीमापात्रात आजवरची सर्वात मोठी कारवाई
3 दुष्काळात कोटय़वधींचा हरिजागर!
Just Now!
X