News Flash

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; धरण व नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

शासकीय यंत्रणा सतर्क; जिल्ह्यातील १ राज्यमार्ग व २ प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद

कोल्हापुरात सोमवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी देखील कायम आहे. सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत २४ तासात ८ फुटांनी वाढ झाली असून, उद्या सकाळ पर्यंत पाणी यावर्षी प्रथमच पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. तर गगनबावडा तालुक्यात सुमारे १३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात तीन आठवड्यानंतर पावसाचे दमदार आगमन झाले आहे. कालच्या पेक्षा आज पावसाची गती अधिक होती. सकाळपासून जिल्ह्याच्या सर्व भागात संततधार पाऊस पडत आहे. धरण, नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

राधानगरी तालुक्यात पावसाने जोर धरला असल्याने पंचगंगा नदीचे पाणी झपाट्याने वाढत आहे. कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत २४ तासात ८ फुटांनी वाढ झाली आहे. काल सायंकाळी ११. ६ फुट असणारी पाणी पातळी आज सकाळी १० वाजता १७.६ फुट, दोन वाजता १८ फुट तर सायंकाळी ५ वाजता १९. ४ फुट होती. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ८ बंधारे पाण्याखाली आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग व २ प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

शासकीय यंत्रणा सतर्क –

पाऊस आणि वार्‍यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मध्यवर्ती बस स्थानक चौकात मोठे झाड उन्मळून पडले होते. त्याखाली एक मोटार अडकून तिचे मोठे नुकसान झाले. वाहतूक पोलीस व अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेऊन पडलेले झाड दूर करून वाहतून पूर्ववत केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 7:46 pm

Web Title: rains intensified in kolhapur rapid rise in dam and river water levels msr 87
Next Stories
1 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरमधील तिघांचे यश
2 “सुशांत सिंहच्या असिस्टंट मॅनेजरची बलात्कार करून हत्या”; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट
3 पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान लॉकडाउन; करोनाची साखळी तोडण्यासाठी निर्णय
Just Now!
X