30 November 2020

News Flash

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवार, ७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. याबाबतची शिफारस आता राज्यपालांकडे करण्यात येणार आहे.

यापूर्वी ३ ऑगस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलं होतं. परंतू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने हे अधिवेशन ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत माहिती देताना संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले, “पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरला सुरु होईल. हे अधिवेशन किती दिवसांचं असेल, कशा पद्धतीने होईल हे ठरवण्यासाठी अधिवेशनाआधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. या बैठकीत अधिवेशन किती दिवसांचं असायला पाहिजे, अधिवेशनात कुठले विषय घेतले पाहिजेत हे सर्व ठरेल.

सप्टेंबपर्यंत मुदत

अधिवेशन संस्थगित झाल्यावर पुढील अधिवेशन सहा महिन्यांच्या कालावधीत बोलविण्याची नियमात तरतूद आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ मार्चच्या सुमारास करोनामुळे संस्थगित करण्यात आले होते. यामुळे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत अधिवेशन बोलवावे लागेल. यामुळे ऑगस्ट महिनाअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात छोटे अधिवेशन बोलाविण्याची योजना आहे. तसे संकेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 10:12 pm

Web Title: rainy session of the maharashtra legislature from september 7 aau 85
Next Stories
1 राज्यात वाहतुकीचे नवे नियम; दुचाकीस्वारांना मोठा दिलासा, तर चारचाकी वाहनधारकांना…
2 रायगड जिल्ह्यात करोनाचे ३९८ नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू
3 ठाकरे सरकारकडूनही लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय
Just Now!
X