मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून योगगुरु बाबा रामदेव यांना टोला मारला आहे. नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी पुढील पंतप्रधान कोण होईल हे सांगणं कठीण असल्याचं म्हटलं होतं. याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी रामदेव बाबा यांच्यावर टीका करत नेत्रासन करण्याचा सल्लाच दिला आहे.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही दाखवलं आहे. रामदेव बाबा दोघांकडेही पाहत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. बाजूला रामदेव बाबा यांचं पुढील पंतप्रधान कोण होईल हे सांगणं कठीण असल्याचं वक्तव्य लिहिण्यात आलं असून कंसात मोदी प्रशंसक लिहिलं आहे. यामुळेच राज ठाकरे यांनी त्यांना नेत्रासन कऱण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे दृष्यी सुधारते असंही उपहासात्मकपणे लिहिण्यात आलं आहे.

Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
Sanjay Raut ANI
संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “सांगलीतून कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल..”

काय बोलले होते बाबा रामदेव –
2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा देत त्यांना सत्तेत आणण्याचं आवाहन करणारे योगगुरु बाबा रामदेव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना महत्त्तवाचं विधान केलं होतं. सध्याची राजकीय परिस्थिती कठीण आहे. पुढील पंतप्रधान कोण असेल, हे आताच सांगू शकत नाही, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. देशातील राजकीय परिस्थिती खडतर बनली असून पुढचे पंतप्रधान कोण असतील याबाबत काहीच सांगू शकत नाही. मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलेले नाही आणि कोणाला पाठिंबाही किंवा विरोधही केलेला नाही असंही ते म्हणाले होते.