News Flash

किंबहुना वापरलं तर चालेल ना? -राज ठाकरे

पत्रकारांना केला मिश्कील प्रश्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रावर दुसऱ्यांदा करोनाचं संकट गडद झालं आहे. सतत वाढत चाललेली रुग्णसंख्या आणि वेगानं होणारं संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. सरकारने निर्बंध लागू केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून सातत्यानं उच्चारल्या जाणाऱ्या किंबहुना शब्दावर मिश्कील प्रश्न केला.

राज्य सरकारने कडक निर्बंधांबरोबरच वीकेंड लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विविध सूचना केल्या. बैठकीत राज ठाकरे यांनी विविध सूचना केल्या. याची माहिती राज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आणखी वाचा- अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला बोलताना राज ठाकरे म्हणाले,”काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी कॉल केला होता. लॉकडाउनच्या संदर्भात मी त्यांना भेटीची विनंती केली होती. त्यांचा मला कॉल आला. त्याच्या आजूबाजूला कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. त्यांनी झूमवर बोलता येतील, असं ते म्हणाले. पुन्हा एकदा लॉकडाउन हे लोकांमध्ये पसरलं. रुग्णांची संख्या वाढतीये. किंबहुना…. किंबहुना वापरलं तर चालेल ना?,” असं राज म्हणाले. त्यावर सगळ्यांनी हसून होकार दिला.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय? की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय?”; राज ठाकरेंचा टोला

काय म्हणाले राज ठाकरे?

“महाराष्ट्रात करोना वाढीची दोन कारण आहेत. महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे इथे इतर राज्यातून येणारे लोक भरपूर आहेत. हे लोकं दररोज राज्यात येतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण मोजले जात आहेत. तर इतर राज्यात रुग्ण मोजले जात नाहीत. तिथेही अशीच परिस्थिती असणार, पण रुग्ण मोजले तर समोर येईल,” असं राज ठाकरे म्हणाले.

“एकट्या राज्य सरकारला बोलून चालणार नाही करोना हा देशाचा विषय आहे. आज लाट इकडे आहे उद्या तिकडे असेल. आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचं आहे. लसीकरणही वाढवायला हवं. त्याला वयाचं बंधन नको. त्यातील टेक्निकल बाबी मला माहिती नाहीत, पण वयाचं बंधन नकोच. सर्वजण लॉकडाऊन पाळतील अशी आशा आहे,” असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 11:50 am

Web Title: raj thackeray press conference after meeting with uddhav thackeray bmh 90
Next Stories
1 “शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे वसूली चालू होती…”
2 बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी केलं आवाहन
3 टोला लगावल्यानंतरही आनंद महिंद्रांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार; म्हणाले….
Just Now!
X