News Flash

“डब्ल्यूएचओ काही माझ्याकडून सल्ले घेत नाही”; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

राज ठाकरेंनी मांडली अनलॉकवर भूमिका

राज्यातील परिस्थिती करोनामुळे ठप्प झाली आहे. दिवसेंदिवस आकडा वाढत असून, काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली, तरी परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. परंतु, करोना आणि लॉकडाउनमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, आर्थिक प्रश्नांनी डोकं वर काढलं आहे. सध्याच्या अनलॉकच्या परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा- उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे

राज ठाकरे एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत. यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणं गरजेचं आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,” असं सवाल राज ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे

लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय चुकला का?, या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी काही यातला तज्ज्ञ नाही आणि डब्ल्यूएचओही माझ्याकडून काही सल्ले घेत नाही. परंतु, मी सुरूवातीला डॉक्टरांशी बोललो होतो. त्यांचं म्हणणं होतं की, ‘सुरूवातीच्या काळातच कडक लॉकडाउन पाळणं गरजेचं होतं. ते पाळलं गेलं नाही. आता ही गोष्ट आपल्या हाताबाहेर गेली आहे.’ मी मंत्रालयात बैठकीला गेल्यानंतर म्हणालो होतो की, आपल्याला या विषाणूंसोबत जगायला शिकावं लागेल,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 10:18 am

Web Title: raj thackeray says im not specialist about coronavirus situation bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “…नाहीतर नेहमीप्रमाणेच ‘शिक्षणाच्या आयचा घो’ होईल”
2 टाळेबंदीत बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ
3 खासगी शाळांचा पालकांना नवा आर्थिक फास
Just Now!
X