मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शालेय शिक्षणामध्ये मराठी सक्तीची करावी, ही भालचंद्र नेमाडेंनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ते शनिवारी नाशिकमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते. मराठी माध्यमाच्या शाळांतून उत्कृष्ट दर्जाचे इंग्रजी शिकवले गेल्यास, पालक आपल्या मुलांना नक्कीच मराठी शाळांमध्ये पाठवतील. मात्र, त्यासाठी सरसकटपणे इंग्रजी शाळा बंद करणे, अयोग्य असल्याचे मत राज यांनी व्यक्त केले. इंग्रजी शाळा बंद करण्याऐवजी मराठी शाळांमध्येच दर्जेदार इंग्रजी शिकवल्यास हा प्रश्न आपोआप निकाली निघेल, असे राज यांनी सांगितले.
याशिवाय, गुजरातमधील खा. किरीट सोळंकी यांनी पश्चिम रेल्वेचे मुंबईतील कार्यालय गुजरातमध्ये हलवण्याच्या मागणीविषयी राज यांना विचारले असता, आपण पूर्वीपासूनच या प्रश्नावर आवाज उठवत आलो आहोत. मात्र, माध्यमे नेहमीच माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आल्याचे राज यांनी सांगितले. |

इंग्रजी शाळा बंद कराव्यात – भालचंद्र नेमाडे