News Flash

महाराष्ट्रात मनसेचं ‘बाप’ – राज ठाकरे

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून झालेला बदल चांगला आहे. मात्र, महाराष्ट्रात या क्षणाला तरी तसे वातावरण नाही.

| January 9, 2014 12:30 pm

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून झालेला बदल चांगला आहे. मात्र, महाराष्ट्रात या क्षणाला तरी तसे वातावरण नाही. महाराष्ट्रात आम्हीच बाप आहोत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये केले.
नाशिकमधील पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील यशाबद्दल काय वाटते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, दिल्लीमधील घडलेला बदल चांगलाच आहे. इतर जे राजकीय पक्ष सध्या सत्तेवर बसले आहेत. त्यांना जाणीव होईल की जनतेची कामे केलीच पाहिजेत. नाहीतर लोकं दुसरीकडे जातील. कॉंग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये काम न केल्यामुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली. महाराष्ट्रात मात्र सध्या तसे वातावरण नाही. इथे आम्हीच बाप आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 12:30 pm

Web Title: raj thackerays comment on aam adami party
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 कोरडवाहू शेती अभियानाला मंत्रिमंडळाची मंजुरी
2 कोसळणाऱ्या विजेचा इशारा दोन तास आधी!
3 ‘गोसीखुर्द’च्या कालवे, वितरिकांची कामे अपूर्ण
Just Now!
X