यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर दौलत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.

एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  करोना संसर्ग कमी झाल्यानंतर पुरस्कार वितरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देण्यात आला होता.

LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
PM Modi receives the Order of the Druk Gyalpo by Bhutan King Jigme Khesar
पंतप्रधान मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित; पहिल्यांदाच घेतला ‘हा’ वेगळा निर्णय!

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

सन १९८४ पासून आत्तापर्यंत भाई माधवराव बागल, व्ही. शांताराम, डॉ. बाबा आढाव, तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी, गुरु हनुमान, नानासाहेब गोरे, चंद्रकांत मांढरे, कुसुमाग्रज, मायावती, न्या. पी. बी. सावंत, रॅंग्लर नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, भाई वैद्य, शरद पवार, पुष्पा भावे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार मिळाल्याने माझ्या वैद्यकीय,सामाजिक कार्याचा सन्मान – 

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. जन्मापासून मी शाहू महाराजांच्या लोककार्याचा आदर करीत आलो आहे. त्यांनी वंचित लोकांसाठी विकासाचे दरवाजे उघडे केले होते. त्यांच्याच कार्याची प्रेरणा घेऊन मी सर्वसामान्य 1 लाख 62 हजार लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. कोल्हापूर मध्ये गेल्यानंतर मला त्यांच्या कार्याची उंची अधिक समजलेली होती. त्यामुळे शाहू महाराजांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने माझ्या वैद्यकीय,सामाजिक कार्याचा सन्मान झाला आहे. हा पुरस्कार मी माझ्या असंख्य रुग्णांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.