News Flash

मला विचारणा झाली होती ही गोष्ट खरी आहे, पण … – राजेंद्र यड्रावकर

रश्मी शुक्लांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाला दिला आहे दुजोरा, जाणून घ्या काय म्हणाले...

संग्रहीत

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकासआघाडीमध्ये न जाता भाजपाबरोबर रहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली. त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून काय पुरावे पाहिजेत, असं केलं आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली.

“रश्मी शुक्ला पाया पडत रडत म्हणाल्या होत्या, मैं माफी मांगती हूँ”, जितेंद्र आव्हाडांचे गंभीर दावे!

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर याबाबत बोलताना म्हणाले, “मला विचारणा झाली होती ही गोष्ट खरी आहे, पण मी त्याचवेळी त्यांना सांगितलं होतं की, मी अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे, मतदारसंघातील जनतेचा जो निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल. या पद्धतीची भूमिका त्यावेळी मी स्पष्ट केली होती. त्यानंतर जाहीर मेळावा झाला ज्यामध्ये शिरोळ तालुक्यातील समस्त जनतेने सांगितलं की, महाविकासआघाडी सरकारसोबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपण जायचं आहे.”

“रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट”

तसेच, “आत्तापर्यंत हे कुणी बोलायला तयार नव्हतं. आता बोलतील. चौबे नावाचे अधिकारी कायदा-सुव्यवस्था सह आयुक्त होते. सर्वात मोठी पोस्ट होती. ते स्वत:साठी पोस्टिंग मागतील का? त्यांचे संबंध थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत असतात. ते कुठल्यातरी नवाज, इंगोलेसोबत बोलतील का? यांनीच माणसं प्लांट करायची, यांनीच माणसांना संभाषण करायला लावायचं, यांनीच ते टेप करायचं आणि यांनीच त्याचा वापर बाजारात करायचं. मला रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट म्हणून काम करतात हे सांगायचं होतं, म्हणून मी यड्रावकरांचं ट्वीट केलं”, असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 6:16 pm

Web Title: rajendra yadravkar clarified the claim of jitendra awhad msr 87
Next Stories
1 “अहो उद्धवजी, राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता तुम्हाला खरंतर…”
2 जिल्ह्य़ात बेकायदा मोबाइल मनोरे
3 मनोर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल
Just Now!
X