20 September 2020

News Flash

पाचाड येथे जिजाऊ पुण्यतिथी साजरी

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे जिजाऊ माँसाहेबांची ३४३ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे जिजाऊ माँसाहेबांची ३४३ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जिजाऊ वाडय़ाजवळ असलेल्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. या वेळी आमदार भरत गोगावले, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, आ. मनोहर भोईर, पंचायत समिती सभापती दीप्ती फळसकर, उपसभापती प्रीती कालगुडे, आणि तहसीलदार संदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते. रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी मुख्यंमंत्र्यांनी ५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. हा निधी लवकर मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार गोगावले यांनी या वेळी सांगितले. रायगड किल्ला आणि पाचाडचा जिजाऊवाडा यांचे पुनरुज्जीवन करण्यास राज्य सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

छत्रपतींना शौर्याचे धडे देणाऱ्या आणि स्वराज्य स्थापनेसाठी प्रवृत्त करणाऱ्या जिजाऊचा आदर्श प्रेरणादायी असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी आमदार मनोहर भोईर, दीप्ती फळसकर आणि रघुवीर देशमुख यांनीही राजमातांना आदरांजली व्हायली.

सरकारला पायउतार व्हावे लागेल. मागील सरकारने रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी अनेक घोषणा केल्या होत्या, मात्र त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. मुख्यमंत्र्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगड किल्ल्यावर हजेरी लावली आणि किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी ५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्याची पूर्तता करावीच लागेल अन्यथा युती सरकारलाही पायउतार व्हावे लागेल, असा टोला आमदार गोगावले यांनी लगावला. १ जुल रोजी रायगड किल्ल्यावर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:38 am

Web Title: rajmata jijabai death anniversary celebrate in pachad
Next Stories
1 जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता  
2 काँग्रेसच्या सहा जिल्हाध्यक्षांची घोषणा
3 सांगलीत चार नगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू
Just Now!
X