26 February 2021

News Flash

..तर सरकारला शॉक देऊ, वाढीव वीज बिलांवरुन राजू शेट्टींचा इशारा

वाढीव वीज बिलांविरोधात राजू शेट्टी आक्रमक

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हाताला रोजगार नाही. अशात कोणत्या ग्राहकांनी किती वीज वापरली याची खातरजमा न करता वाढीव वीज बिलं पाठवण्यात आली आहेत. सरकारने ही वीज बिलं माफ केली नाहीत तर प्रसंगी शॉकही देऊ असं वक्तव्य आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. दूध दरवाढीसंदर्भात आंदोलन केल्यानंतर आता वीज बिलांवरुन राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.कोल्हापूरमध्ये वीज बिलांबाबत आज राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे आक्रमक वक्तव्य केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधला घटक पक्ष आहे. मात्र सामान्य माणसांच्या प्रश्नावरुन ते सरकारविरोधात उभे ठाकले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 5:44 pm

Web Title: raju shetty aggressive against thackeray government on light bill issue scj 81
Next Stories
1 “सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी आदित्य आणि राऊत यांची नार्को टेस्ट करा सगळं सत्य समोर येईल”
2 मुंबई म्हाडा उपाध्यक्षांसह पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; शिर्डी संस्थानच्या सीईओपदी बगाटे
3 शरद पवारांचे खंदे समर्थक भाजपात
Just Now!
X