स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांना आज (शुक्रवार) बारामतीच्या सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. शेट्टी यांच्यासोबतच सतीश काकडे यांचाही जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर शेट्टी आणि काकडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, आरोपपत्र दाखल होईपर्यंत इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्‍यात जाऊ नये आणि प्रक्षोभक भाषण करू नये या अटी न्यायालयातर्फे जामीन अर्जात घालण्यात आल्या आहेत.
उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. या पार्श्‍वभूमीवर राजू शेट्टी यांना अटक करण्यात आली होती. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने त्याचा फटका सर्वानाच बसला.
दरम्यान, दिल्लीतील कृषीभवन येथे ‘राष्ट्रीय किसान महासंघा’ने पुतळा जाळून सांगलीत शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराचा निषेध व्यक्त केला.