News Flash

जयंत पाटील, राजू शेट्टी उद्या एकाच व्यासपीठावर

आ. पाटील विरोधक एकत्र करून त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न खा. शेट्टी यांनी केला होता.

जयंत पाटील, राजू शेट्टी

सांगली : गेली अनेक वर्षे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येत आहेत. बदलत्या राजकीय पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून या दोन नेत्यांमधील दुरावा कमी होत ते  एकत्र येण्याच्या दिशेने पावले पडू लागली आहेत. या अंतर्गतच रविवारी हे दोन नेते एका व्यासपीठावर येत असल्याने राजकीय निरीक्षकांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आ. जयंत पाटील यांचा वाळवा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहे. या मतदारसंघाच्या समावेशामुळे तसेच साखर कारखानदारीवरून पाटील आणि शेट्टी यांच्यातील वाद हा पश्चिम महाराष्ट्रात सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीवेळीपासून ते गेल्या वर्षी इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीपर्यंत या दोन नेत्यांमधील संघर्ष जनतेस पाहण्यास मिळाला होता. आ. पाटील विरोधक एकत्र करून त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न खा. शेट्टी यांनी केला होता. यातूनच इस्लामपूर नगरपालिकेत सत्ताबदलही घडवून आणला.

मात्र, बदलत्या राजकीय वातावरणात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी संघटनेशी फारकत घेत स्वतंत्र रयत क्रांती संघटनेची स्थापना करून सवतासुभा मांडला. या पाश्र्वभूमीवर खा. शेट्टी आणि आ. पाटील यांच्यात जवळीक निर्माण झाली. मात्र, खा. शेट्टी यांनी राष्ट्रवादीशी जवळीक न करता काँग्रेसशी जवळीक करण्याचे संकेत दिले आहेत. या पाश्र्वभूमीवरच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन नेते २२ एप्रिल रोजी मिरजेत एकत्र येत आहेत. या कार्यक्रमामध्ये आजवर एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले हे दोन नेते काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:40 am

Web Title: raju shetty will share stage with jayant patil in an event
Next Stories
1 भयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट
2 मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी
3 बिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू
Just Now!
X