01 October 2020

News Flash

उध्दवा अजब तुझे सरकार! – राजू शेट्टी

दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता, असा सवालही केला

संग्रहीत छायाचित्र

दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात  राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काल बारामतीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला परवानगी नसल्याने करोना काळात नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरून राजू शेट्टी व त्यांच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या बद्दल राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून उद्धवा अजब तुझे सरकार…असे ट्विट करत, दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता? असा सवाल केला आहे.

मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करता. मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतकऱ्याने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस जबाबदार असणा-या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता? असं राजू शेट्टी यांनी ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- “मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद”… म्हणत कोल्हापुरात घंटानाद आंदोलन

“महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन करत आहे. उत्पादन खर्चापेक्षा १५ रुपये कमी दराने तो दूध विकत आहे. त्यावेळी कुणाला दया आली नाही. अनेक दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना वाटलं नाही. परंतू , परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून जर का आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर होय आम्ही गुन्हा केलेला आहे. पोलिसांना जे काय करायचं ते करावं, सरकारला जे काय करायचं ते करावं. अजूनही आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करणार.” असा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटबरोबर जोडलेला आहे.

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांना दिला अभ्यास करण्याचा सल्ला; म्हणाले…

मोर्चातील सहभागी शेतकऱ्यांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आता आक्रमक व्हा, मंत्री आले की दुधाने आंघोळ घाला”, असं राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केलं.

राजू शेट्टींच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी फिजकल डिस्टंसिंगचे पालन केले गेले नाही. शिवाय, अनेक कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क देखील लावलेले नव्हते. मोर्चाला परवानगी नसूनही गर्दी जमवून भाषणबाजी झाली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 9:43 am

Web Title: raju shettys criticism of the state government msr 87
Next Stories
1 मराठी बांधवांमध्ये संतापाची लाट, मराठी विरुद्ध कन्नड वाद टाळा; एकनाथ शिंदेंच येडीयुरप्पांना पत्र
2 “बबड्याची सीरिअल पाहण्यापेक्षा…”; रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला
3 रायगड जिल्ह्यात ५३४ इमारती धोकादायक
Just Now!
X