कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी अनेकजण मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. यामध्ये राजकारणीही मागे राहिलेले नाहीत. काही दिवसांपुर्वी भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रस्त्यावर लोकांकडे पैसे मागत मदत गोळा केली होती. यासंबंधी व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. मात्र यावरुन राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी विनोद तावडेंच्या या कृत्याचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

फेसबुकच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. यासोबत त्यांनी विनोद तावडेंचा व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओत विनोद तावडे कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त बंधू भगिणींसाठी मदत करा असं माईकवर बोलत असल्याचं ऐकू येत आहे.

NANA PATOLE AND SHAHU MAHARAJ
शाहू महाराजांच्या उमेदवारीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले, “छत्रपती परिवाराकडून…”
dhairshil mane
कोल्हापूर: खासदारांचा संपर्क नाही; ही विरोधकांची स्टंटबाजी, धैर्यशील माने
Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवरायांना ‘महाराज’ म्हणण्यापूर्वी नेमकं काय म्हटलं जायचं? ठाऊक आहे का?
Dilip Mohite Patil oppose Shivajirao Adhalarao Patil
“…तर राजकारण सोडून घरी बसेन”, शिवाजीराव अढळरावांचा उल्लेख करत दिलीप मोहितेंचा अजित पवारांना इशारा

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यांनी टीका करताना लिहिलं आहे की, “स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे”.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी भाजपाच्या वतीने बोरिवलीत ११ ऑगस्टला मदतफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. विनोद तावडे यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी मदत फेरीमध्ये सहभागी झाले होते. पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यासाठी ११० डबे तयार करण्यात आले होते. प्रत्येक डब्यात जमा होणारा संकलित निधी मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्यात येत आहे.