23 September 2020

News Flash

“मुंबईत वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का?,” प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेत संतप्त सवाल

"आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का?"

संग्रहित (PTI)

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये संपूर्ण देशातून लोक येऊन वास्तव्य करत असतात. लोकांना तिथे आपलं घर निर्माण करुन वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का ? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी १५ सप्टेंबरला करोनाशी लढा देण्यासाठी सरकारने केलेल्या उपयायोजनांची माहिती दिली होती. त्यावरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे कंगनाच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं. “आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का?,” असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी विचारला.

“महाराष्ट्राबद्दल बोलायचं गेल्यास मुंबई, पुणे, ठाणे या मोठ्या शहरांमध्ये करोनाची गंभीर परिस्थिती आहे. संपूर्ण देशातील लोकांना तिथे घर निर्माण करण्याची संधी देऊन या शहरांनी चूक केली आहे का? त्यांच्यावर टीका होणार का? आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का?,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

“करोनाविरोधील लढाईची सुरुवात केंद्राच्या आदेशाचं पालन करतच सर्व राज्यांनी केली. आता अनलॉक प्रक्रियादेखील केंद्रीय गृहमंत्रालयाकडून येणाऱ्या गाइडलान्सनुसारच होत आहे. जर आपण सर्वजण एकत्र लढत आहोत तर आरोप-प्रत्यारोप करण्याची गरज नाही,” असं मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं.

पुढे ते म्हणाले की, “आज अनेक समस्या आहेत. ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमिडीसेवेरची कमतरता आहे. सामूहिकपणे याचा सामना न केल्यास समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. राज्य सरकारांकडे आज निधीची कमतरता असून त्याची अनेक कारणं आहेत. केंद्राकडून मिळणारा जीसीटी अद्याप मिळालेला नाही”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:44 pm

Web Title: rajya sabha ncp mp prafull patel on maharashtra mumbai corona fight gst sgy 87
Next Stories
1 चीन शेजारी देश असल्यानं आपण सावध राहायला हवं होतं; आझाद यांनी मोदी सरकारला सुनावलं
2 चांगलं लक्षण! दिल्लीत तीन पैकी एका व्यक्तीच्या शरीरात कोविड अँटीबॉडीज
3 उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा, म्हणाले…
Just Now!
X