पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी धावून गेली आहे. यामध्ये पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ५ हजार साड्या पाठविण्यात आल्या आहेत. तसेच जवळपास २० हजार बुंदीचे लाडू देखील सांगली कोल्हापूर कडे रवाना केल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम याही वेळेस केले आहे. या पूर्वी दुष्काळ आणि केरळ येथील आपत्तीच्या वेळेस मदतीला धावून गेली होती. सध्या सांगली आणि कोल्हापूर येथे पूरपरिस्थिती आहे. या ठिकाणच्या नागरिकाना मदत समितीच्या वतीने देण्यात आली आहे. भाविकांनी श्री रुक्मिणी देवीला अर्पण केलेल्या या साड्या आहेत. या साड्या पूरग्रस्त भागातील महिलांना वाटप केले जाणार आहे.जवळपास ५ हजार साड्या या भागातील महिलांना वाटप करण्यात येणार आहे.

त्याच बरोबरीने मंदिर समिती भाविकांना प्रसाद म्हणून चांगल्या प्रतीचा बुंदीचा लाडू बनवीत आहे. हा प्रसाद म्हणून जवळपास २० हजार लाडू पूरग्रस्त भागात वाटप करणार आहेत. समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले, सह अध्यक्ष मा गहिनीनाथ महाराज औसेकर, इतर सर्व सदस्य, महिला सदस्या शकुंतला नडगिरे, ऍड माधवी निगडे व सौ साधना भोसले यांनी ही सूचना मांडली होतीत्यानुसार मदत देत असल्याचे ढोले यांनी सांगितले. पंढरपूर येथे देखील मंदिर समितीच्या वतीने पूर परिस्थितीत स्थलांतरीत नागरिकाना सकाळचा नाष्टा,दुपार आणि रात्रीचे जेवण दिले होते. पूरग्रस्तांना मदत म्हणून समितीने देखील खारीचा वाट उचलला आहे.