|| प्रदीप नणंदकर

लातूर : संक्रांतीच्या सणासोबत तीळ, बाजरी आदी काही धान्यांना, तसेच राळे, या भातवर्गीय धान्यालाही पूर्वी महत्त्व होते. कालपरत्वे राळे मागे पडले. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला महिलांच्या खाद्यान्नातील राळ्याचा भात हा इतिहास जमा झाला. जगातील ५० देशांमध्ये खाण्यात येणारे राळे भारतात मात्र दुर्मीळ झाले आहे. राळे पित्तनाशक आणि मधुमेहींसाठी लाभदायी खाद्य आहे. अवर्षण प्रतिकारक्षमता असलेल्या या पिकासाठी फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनने (एफएओ) २०२३ हे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करण्याचे ठरवले आहे.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
use molds 40 years ago on manufacturers for sugar gathi Pune
साखर गाठीसाठी नवे साचे मिळेनात; उत्पादकांवर ४० वर्षांपूर्वीचे साचे वापरण्याची वेळ

४० वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या शेतात घरी खाण्यापुरते वर्षभर लागणारे खाद्यान्न घेतले जाई. त्यात राळे, वरई, भगर अशा पदार्थाकडेही सर्वाचे लक्ष असे. ही पिके घेतली जात असत. कालांतराने पैसे देणाऱ्या पिकामागे पळण्याची स्पर्धा सुरू झाली व त्यानंतर शेतातील अशी बाजारात फारसे पैसे न मिळणारी पिके लोप पावली. राळे म्हणजे काय हा प्रश्न पन्नाशी ओलांडलेल्यांनाही त्यामुळेच पडला आहे. अश्मयुगापासून राळे हे पीक उत्पादित होत असल्याचा दावा केला जातो आहे. अजूनही आदिवासी भागात पारंपरिक बियाणांची जपणूक करून हे पीक घेतले जाते. गहू, भात या प्रमुख अन्नपदार्थाशी आपला थेट दररोजचा संबंध असतो. भरडधान्यात जे ज्वारीपेक्षा आकाराने लहान असतात, त्यात बाजरी, राळे, वरई, भगर असे प्रकार येतात. राळे हे भातवर्गीय पीक आहे. पित्तनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्य अधिक असलेले, पोषणमूल्य पूरक, कॅल्शियम, लोहाचे प्रमाण अधिक, मधुमेहीसाठी हे जास्त लाभदायक आहे. हवामान बदलात तग धरून राहणारे हे वाण असून अधिक तापमान व अवर्षण प्रतिकारक्षमता असलेले हे पीक आहे. एका एकरसाठी केवळ दोन किलो बियाणे पुरते व तीन महिन्यांत किमान १० क्विंटल उत्पादन मिळते. याचे इंग्रजी नाव फॉक्सटेल मिलेट असे असून मराठीत राळे, कन्नडमध्ये ‘नवनी’ तर संस्कृतमध्ये ‘कुंगू’ या नावाने हे ओळखले जाते.

फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनने (एफएओ) २०२३ हे राळे पिकासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करण्याचे ठरवले आहे. उत्तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, जर्मनी, फ्रान्स, चायना, जपान, कोरिया, भारत, ब्राझील, अजेर्ंटिना, कोलंबिया, इजिप्त, आफ्रिका अशा सुमारे ५० देशांत राळे खाल्ले जाते. पूर्णपणे हे सेंद्रिय पीक आहे. याला कोणत्याही फवारणीची अथवा रासायनिक खताची गरज लागत नाही. राळय़ाचा भात, खिचडी, वडे, भाकरी, उपमा केले जाते. भारतात आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रात याचे उत्पादन घेतले जाते.

जगभर विविध पशूंना खाण्यासाठी म्हणूनही राळय़ाचा वापर केला जातो. देशात सध्या राळ्याला ४० रुपये किलो भाव आहे. मात्र,  विदेशात २०० रुपये किलो इतका चढा भावही काही ठिकाणी मिळतो.

हवामान बदलाने निर्माण झालेल्या अडचणीत मार्ग काढण्यासाठी अशा पिकांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देऊन त्याच्या विक्रीसाठी शासकीय यंत्रणेने पुढाकार घेतला तर राळय़ाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर आपल्याकडे होऊ शकते.

समाजमाध्यमावर  माहितीनंतर मागणी

कर्नाटकातील आळंद जिल्हय़ात असलेल्या सलगुंदा गावातील शांतप्पा या शेतकऱ्याने कृषी विज्ञान केंद्रातून यावर्षी राळय़ाचे बी घेतले व ते शेतात पेरले. उत्पन्न चांगले निघाले. पण विकायचे कुठे हे शांतप्पांना माहिती नव्हते. अखेर त्यांनी लातूरच्या शहा कन्हैयालाल मोहनलाल या आडत दुकानात माल आणला. तरुण व्यापारी मनन शहा यांना शांतप्पाने राळय़ाबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी राळ्याची माहिती समाजमाध्यमावर दिली अन् राळे विकले जाऊ लागले. औषधी असलेल्या या वाण उत्पादनाच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे, मनन शहा यांनी सांगितले.