भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी मुंबईत एल्गार मोर्चाशहरातील  निघाला असतानाच दुसरीकडे सांगलीत २८ मार्च रोजी (बुधवारी) भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. पुष्पराज चौक येथे भिडे गुरुजींचे ३० फूट उंचीचे भव्य पोस्टर उभारण्यात आले असून या प्रकरणी आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली पोलिसांकडे धाव घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी मुंबईत सोमवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आला. मुंबईत संभाजी भिडेंविरोधात कारवाईची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे सांगलीत संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ पोस्टर उभारण्यात आले आहे. ३० फूट उंचीचे हे पोस्टर असून शहरातील अन्य ठिकाणीही पोस्टर लावले जात आहे. बुधवारी सांगलीत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally in sangli to support shri shiv pratishthan leader sambhaji bhide
First published on: 26-03-2018 at 14:49 IST