News Flash

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन

त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं.

राम खांडेकर यांनी लोकसत्तासह विविध वर्तमानपत्रं, मॅगझिनमध्ये लिखाणही केलं होतं.

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी राम खांडेकर याचं काल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं.

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मुकूल, सून संगीता, दोन नातवंडं असा परिवार आहे. खांडेकर यांनी देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणूनही ते कार्यरत होते.

१९८५ साली नरसिंह राव यांनी त्यांचा रामटेक मतदारसंघाच्या नियोजनाची जबाबदारी खांडेकर यांच्याकडे सोपवली होती. १९९१ मध्ये जेव्हा नरसिंह राव पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांचे विशेष अधिकारी म्हणून खांडेकर यांची नियुक्ती झाली. खांडेकर यांनी राव यांच्या निधनापर्यंत त्यांच्यासोबत काम केलं.

खांडेकर यांनी अनेक वर्तमानपत्र आणि मॅगझिन्समध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे लेखही लिहिले. अनेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी त्यांच्या कामाबद्दल आणि अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटींसंदर्भातले ६० ते ७० लेख लिहिले.
राजकारण क्षेत्रासंदर्भातल्या त्यांच्या जवळपास पाच दशकांच्या अनुभवांबद्दल ते लोकसत्तामध्ये स्तंभलेखनही करत होते. २०१९ साली हे सर्व लेख ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाच्या रुपात प्रकाशित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 11:17 am

Web Title: ram khandekar worked as an osd to former prime minister narasimha rao died at nagpur vsk 98
Next Stories
1 रायगडात करोनाची दुसरी लाट जास्त व्यापक
2 “करोनामुळे तुमचा मुलगा गेला,” घरी बसलेल्या मुलाच्या मोबाइलवर रुग्णालयाचा फोन; महिलेसह कुटुंब हादरलं
3 ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकेल का?, आदित्य ठाकरे म्हणाले…
Just Now!
X