येत्या ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान, याविरोधात साकेत गोखले यांच्या घराबाहेर शुक्रवारी भारतीय जनता पक्षच्या कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन केलं.

मिरा रोड येथील काशिमीरा परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी करोनाची परिस्थिती पाहता राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा अशी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. शुक्रवारी ही याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. त्यानंतर मिरा भाईंदरमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोखलेंच्या घराबाहेर विरोध प्रदर्शन केलं. तसंच समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप साकेत गोखले यांच्यावर केले आहेत.

“माझ्या घरा बाहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागरिकांनी गर्दी करून घोषणा दिल्या. काशिमीरा पोलीस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती साकेत गोखले यांनी समाज माध्यमाद्वारे दिली.