31 March 2020

News Flash

लंडनमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही – रामदास आठवले

"वेळ पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल"

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही असं म्हटलं आहे. आपण त्वरित परराष्ट्र मंत्रालय आणि लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानसूर्य म्हणून अवघे विश्व सन्मान करीत असून लंडनमधील पालिकेचा हा निर्णय ब्रिटन सरकारने रद्द करावा यासाठी भारत सरकारतर्फे प्रयत्न करत असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकारतर्फे खरेदी करून तेथे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. त्या स्मारकात आंबेडकरी अनुयायांच्या होणाऱ्या गर्दीबाबत तक्रार झाल्याने लंडनमधील स्थानिक पालिका असणाऱ्या कॅमडेन कौन्सिलने या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

लंडन मधील हेनरी रोडवरील संग्रहालयास अन्यत्र हलवण्याचा लंडनमधील स्थानिक पालिकेचा निर्णय आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी लंडनच्या स्थानिक न्यायालयात महाराष्ट्र सरकारने अपील केले आहे. भारत सरकारतर्फे ही ब्रिटन सरकारशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येण्याचा प्रयत्न आहे. “ब्रिटन आणि भारत दोन्ही सरकारमध्ये चांगले संबंध असून लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ नये म्हणून आपण सर्व स्तरावर प्रयत्न करत आहोत. वेळ पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची याप्रकरणी भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल”, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 5:36 pm

Web Title: ramdas atahavle on ban on museum at br ambedkar home in london sgy 87
Next Stories
1 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी निरर्थक-दिवाकर रावते
2 नागपुरात तरुणाची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या
3 स्वातंत्र्यवीर सावरकरांना न मानणाऱ्यांना चौकात फटकावले पाहिजे-उद्धव ठाकरे
Just Now!
X