News Flash

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

"महाराष्ट्र सरकार करोनाला थोपवण्यात अपयशी ठरलंय"

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीवर राष्ट्रपतींनी विचार करु असं उत्तर दिल्याचं रामदास आठवले यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार करोनाला थोपवण्यात अपयशी ठरलं असल्याची टीकाही केली.

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “अनिल देशमुख यांनी पत्र लिहिलं असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये १०० कोटींच्या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे. जिथे जिथे भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे”.

“महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्र सरकार करोनाला थोपवण्यात अपयशी ठरलं आहे. मी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटलो असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर त्यांनी विचार करु असं सांगितलं आहे,” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्रात परिस्थिती बिघडत असून खूप गंभीर घटना समोर येत आहेत. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचं काम एक पोलीस अधिकारी करतो. गृहमंत्री सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी मिळाले पाहिजेत असं सांगतात. पहिल्यांदाच असं होत आहे त्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे,” अशी माहिती रामदास आठवले यांनी यावेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 11:30 am

Web Title: ramdas athavle meets president ramnath kovid demand president rule in maharashtra sgy 87
Next Stories
1 शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधी संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
2 “देवेंद्र फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळेच….,” संजय राऊतांचा टोला
3 “मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली तर मी…,” अनिल देशमुख यांचं मध्यरात्री ट्विट
Just Now!
X