28 February 2021

News Flash

नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात आठवलेंच्या भाषणाला विरोध

नामविस्तार दिनाच्या‘एक विचार एक मंच’पासून फारकत घेत आठवले गटाने आपला वेगळा मंच उभारला होता.

Ramdas Athawale : नामविस्तार दिनाच्या‘एक विचार एक मंच’पासून फारकत घेत आठवले गटाने आपला वेगळा मंच उभारला होता. त्यामुळे आठवले यांच्या भाषणाला विरोध करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना भाषणादरम्यान विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी काहीजणांनी आठवले यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे आठवलेंना अवघ्या काही मिनिटात आपलं भाषण आटोपत घ्यावं लागलं.

नामविस्तार दिनाच्या‘एक विचार एक मंच’पासून फारकत घेत आठवले गटाने आपला वेगळा मंच उभारला होता. त्यामुळे आठवले यांच्या भाषणाला विरोध करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. याठिकाणी घोषणाबाजी करत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी परिस्थिती आटोक्यात ठेवली.

दरवर्षी नामविस्तार दिन सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक संघटनेचा स्वतंत्र मंच उभारण्यात येतो. मात्र, यावर्षी एकाच मंचावरुन हा सोहळा पार पाडायचा, असा ठराव दलित संघटनांनी मंजूर केला. नामांतराच्या या चळवळीत रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. परंतु, यावर्षी कधी नव्हे ते सर्व संघटना एकत्र येऊनही आठवले यांनी त्यांच्यात सहभागी होण्यास नकार दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 9:41 pm

Web Title: ramdas athawale face strong opposition in marathwada university namvistar din
Next Stories
1 ‘मुंबईतील दुर्घटनांबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान १४ गुजराती व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर लगेच ट्विट करतात’
2 शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी; शिवसेना घालणार मुख्यमंत्र्यांना साकडं!
3 महाराष्ट्रातील भूमिका घेणारे साहित्यिक कुठे गेले? राज ठाकरेंचा सवाल
Just Now!
X