01 March 2021

News Flash

शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र यावी ही बाळासाहेबांची इच्छा- रामदास आठवले

बाळासाहेबांनी प्रथम शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, त्यासाठी आठवले तुम्ही युतीत या असा प्रस्ताव दिला होता.

तुम्ही काँग्रेसकडे असल्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसतो. तुम्ही युतीत या, असेही बाळासाहेबांनी म्हटल्याचे आठवले म्हणाले.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध नव्हता तर विद्यापीठाच्या नावात मराठवाडा हा शब्द ठेवण्याचा त्यांचा आग्रह होता. बाळासाहेबांच्या सूचनेनंतर मराठवाडा हे नाव कायम ठेवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. बाळासाहेबांनी प्रथम शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, त्यासाठी आठवले तुम्ही युतीत या असा प्रस्ताव दिला होता. तुम्ही काँग्रेसकडे असल्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसतो. तुम्ही युतीत या, असेही बाळासाहेबांनी म्हटल्याचे आठवले म्हणाले.

‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी बाळासाहेबांविषयी सांगितले. ते पुढे म्हणाले, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनावेळी मी बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी मला सुरूवातीलाच सांगितले की, माझा बाबासाहेबांच्या नावाला विरोध नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. पण त्या नावात मराठवाडा हे नावही असले पाहिजे, अशी त्यांनी सूचना केली. त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुम्ही सातत्याने काँग्रेसबरोबर असता. त्याचा फटका आम्हाला बसतो. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायला हवी, असे त्यांनी मला म्हटले. त्यानंतर आम्ही एकत्रित पत्रकार परिषदही घेतल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 4:39 pm

Web Title: ramdas athawale remembers shiv sena chief balasaheb thackeray memory about shiv shakti and bhim shakti
Next Stories
1 मातोश्रीच्या बाहेर उभं रहायला मिळालं तरी भारी वाटायचं- देवेंद्र फडणवीस
2 मुंबई आणि औरंगाबादमधून ISIS चे ९ समर्थक ताब्यात, एटीएसची कारवाई
3 सुनील गावसकरांनी सांगितली बाळासाहेबांच्या लोकलप्रवासाची आठवण
Just Now!
X