News Flash

Video : दिलखुलास गप्पा रामदास आठवलेंसोबत…

राज्यातील सत्तांतरांबद्दलच्या शक्यता रामदास आठवलेंनी केली व्यक्त

सध्या राजकीय परिस्थितीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) नेते रामदास आठवले यांनी मांडली भूमिका ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा देशातील आणि राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल दिलखुलास भाष्य करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) नेते रामदास आठवले यांनी आपली भूमिका मांडली. विविध राजकीय चारोळ्या ऐकवत आठवले यांनी राज्यातील सत्तांतरांबद्दलच्या शक्यताही बोलून दाखवल्या आहेत. रामदास आठवले यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली.

रामदास आठवले यांनी केंद्रातील एनडीए सरकारचं काम, राज्यातील उद्धव ठाकरे सरकार यांच्याबद्दल मतं व्यक्त केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं, असं रामदास आठवले म्हणाले. ज्याप्रमाणे राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं, जे कुणालाही वाटलं नव्हतं. अगदी त्याचप्रमाणे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊ शकतात, असंही ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 11:11 am

Web Title: ramdas athawale republican party of india special interview with lokstta bmh 90
Next Stories
1 कोल्हापूर : जेष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांचे हृदयविकाराने निधन
2 कांडेकर हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार राजाराम शेळकेची हत्या
3 लसीकरणातील गोंधळामुळे नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले
Just Now!
X