News Flash

‘गो कोराना गो’ नंतर आठवलेंचे ‘गो.. महाविकास आघाडी गो…!’

राज्यसभेसाठी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आठवलेंची प्रतिक्रिया

‘गो कोराना गो’ नंतर आठवलेंचे ‘गो.. महाविकास आघाडी गो…!’
'गो.. महाविकास आघाडी गो...!'

राज्यसभेसाठी भाजपाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘करोना गो करोना गो असं म्हणताना महाविकास आघाडी गो… असं आम्हाला म्हणावं लाणार आहे,’ असं मत आठवलेंनी नोंदवलं.

आठवले यांनी विधानभवनामध्ये येऊन अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना करोना विषाणूचा देशात होत असणाऱ्या फैलावासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी गो करोना गो या आपल्या व्हायर व्हिडिओमुळे देशात आणि राज्यात करोनाचे कमी रुग्ण अढळून आल्याचा दावा केला. “मी गो करोना असं म्हटलं आहे. त्यामुळे तो महाराष्ट्र काय तर भारतामध्येही जास्त पसरलेला नाही. तरीही सरकारकडून यासंदर्भात काळजी घेतली जात आहे. आम्ही करोनाला जायला सांगितलं आहे. पण तो होऊ नये यासंदर्भातील काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. डॉक्टरांची जबाबदारी आहे. आपल्या गावामध्ये, आपल्यामध्ये करोना येता कामा नये यासाठी आपणही काळजी घेणं गरजेचं आहे,” असं मत आठवले यांनी मांडलं.

फोटो >> ‘Go Corona… Go Corona’ वरुन रामदास आठवले ट्रोल; पाहा व्हायरल मीम्स

राजकीय टोला

निघता निघता आठवलेंनी महाविकास आघाडीलाही टोला लगावला. “जोपर्यंत करोना देशातून जात नाही तोपर्यंत आम्ही गो करोना गो म्हणत राहणार आहोत. तसेच करोना गो करोना गो असं म्हणताना गो महाविकास आघाडी गो… असं आम्हाला म्हणावं लाणार आहे,” असं आठवले म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 11:08 am

Web Title: ramdas athawale says go maha vikas aghadi go scsg 91
Next Stories
1 ‘चंदाराणी मी तुला भेटायला येतोय’, व्हॉट्सअप स्टेटस ठेवत पतीची आत्महत्या
2 करोना लसीच्या नावाखाली द्रव पाजले ; तीन महिलांवर गुन्हा
3 पतीवर अंत्यसंस्कार होताच पत्नीची आत्महत्या, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
Just Now!
X