News Flash

“शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची गरज नव्हती, हा केवळ लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न”; आठवलेंचा हल्लाबोल

"कायदा मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही"

(फोटो एक्सप्रेस फाइल फोटो आणि गणेश शिर्सेकर यांच्याकडून साभार)

शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून मुंबईत दाखल झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केलं. मात्र किसान सभेने मुंबईत केलेलं हे आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी संस्ट असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नव्हती असंही आठवलेंनी म्हटलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसने आठवलेंवर टीका केली असून आठवलेंनी आपल्या या वक्तव्यासाठी माफी मागावी असं काँग्रेसने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Mumbai Farmers Protest: “तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव”

मुंबईतील शेतकरी आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना आठवले यांनी हे आंदोलन केवळ प्रसिद्धिसाठी असल्याचं म्हटलं आहे. “केंद्र सरकारने कायदा केला असून तो मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांनी आता आंदोलन थांबवायला हवं,” असं आठवले यांनी म्हटलं आहे. आठवलेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलीय.

सर्वोच्च न्यायालयानेही सध्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. तसेच केंद्र सरकारनेही दोन वर्षांसाठी हे कायदे लागू न करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे, अशी आठवणही आठवले यांनी करुन दिली आहे. याच दोन गोष्टींचा संदर्भ देत आठवलेंनी पुढे हे आंदोलन केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी करण्यात आलं आहे, असं टोला केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांचे नाव न घेता लगावला आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करत असून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी काम करत असल्याचंही आठवलेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी आता सरकारचं ऐकून घ्यायला हवं आणि आंदोलन थांबवायला हवं, असंही आठवले म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले फॅशन स्ट्रीटवरील दुकानदार; आझाद मैदानातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुकान बंद आंदोलन

आठवलेंनी असं वक्तव्य करुन राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आठवलेंनी हे आंदोलन म्हणजे लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेलं आंदोलन असल्याचं भाष्य करत शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत व्यक्त केलंय. तपासे यांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये आठवले एक मंत्री आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी तातडीने देशातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागायला हवी, असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 5:57 pm

Web Title: ramdas athawale says mumbai farmers protest is just to gain some publicity scsg 91
Next Stories
1 प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे अध्यासन केंद्र सुरू करणार – उदय सामंत
2 ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान’; मुख्यमंत्र्यांनी त्या पाच मुलांचं केलं विशेष कौतुक
3 पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शरद पवारांचा सवाल
Just Now!
X