आज देशभरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक राजकीय नेतेही योग दिन साजरा करण्यासाठी योग करत आहेत, योगदिनाच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत. खासदार रामदास आठवले यांनीही आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी योग दिनानिमित्त एक कविता केली आहे.

आठवले यांनी आपली ही कविता ट्विटरवरुन सर्वांसोबत शेअर केली आहे. ही कविता अशी,

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

“नेहमी करा योग,
तुमच्याजवळ येणार नाही रोग !
नेहमी करा योग,
निघून जाईल तुमचा रोग!

रामदास आठवले हे आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांमुळे ते कायमच चर्चेचा विषय ठरतात. आजही त्यांच्या या कवितेची चर्चा होत आहे.


देशभरात आज योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्व राजकीय नेते या दिवसानिमित्त योगाभ्यास करताना दिसत आहेत. देशवासीयांना या दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा- “हे म्हणजे नौटंकी, पोटात अन्न नाही तो योग कसा करेल?”, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांचे ताशेरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सातव्या योगदिनानिमित्त देशातील जतनेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी करोना कालावधीत योग अभ्यासाचे महत्व वाढल्याचं मत व्यक्त केलं. तसेच आजपासून संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने जगभरातील लोकांसाठी नवीन अ‍ॅप सुरु करणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. एमयोगा असं या अ‍ॅपचं नाव असणार आहे.

“भारताने आज योगप्रसारासाठी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आता जगभरातील लोकांना एमयोगा अ‍ॅपची शक्ती मिळणार आहे. या अ‍ॅपमध्ये कॉम योग प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षणाने अनेक व्हिडीओ जगभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असतील. हे अ‍ॅप म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन विज्ञानाच्या फ्युजनचे उत्तम उदाहरण असेल. मला पूर्ण विश्वास आहे की एम योगा अ‍ॅप जगभरामध्ये योग प्रसाराचं काम करण्यासाठी तसेच वन वर्ल्ड वन हेल्थ या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल,” असा विश्वास पंतप्रधान मोदींनी या अ‍ॅपची घोषणा करताना व्यक्त केला.