03 March 2021

News Flash

राम मंदिराच्या नावावर फसवणूक : रामदास कदम

' पहीले मंदिर , फिर सरकार '

रामदास कदम (संग्रहित छायाचित्र)

राम मंदिर बांधणार म्हणून गेली ३० वर्षे जनतेची फसवणूक सुरु आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. असे असून देखील सरकार चालढकल करीत आहे. म्हणून शिवसेनेने राम मंदिर पहिले हा मुद्दा उचलला असून अयोध्येनंतर सोमवारी पंढरपूर येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. या सभे नंतर चंद्रभागा नदीची आरती केली जाणार आहे. राज्यातील शिवसैनिकांसह संत,महंत,महराज मंडळी देखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेनी राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘ पहीले मंदिर , फिर सरकार ‘ या घोषणेतून उध्दव ठाकरे यांचा आयोध्या दौरा झाला. यानंतर महाराष्ट्रात राम मंदिराच्या मुद्यावरून ठाकरे यांची पहीलीच जाहीर सभा पंढरपुरात आज होणार आहे. येथील कर्मवीर भाऊराव पाटील महविद्यालयाजवळील चंद्रभागा मैदानावर होणा-या सभेसाठी सुमारे ८० फूट बाय ८० फूट इतके मोठे व्यासपीठ उभा करण्यात आले आहे. या वेळी शिवसेनेचे आमदार,खासदार तसेच मंत्रीगण आणि ठाकरे कुंटुबिय असणार आहेत.

याशिवाय राज्यातून आलेल्या शिवसैनिक,नागरिकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सभेसाठी किमान साडे तीन लाख शिवसैनिक आणि रामभक्त येतील. असा अंदाज आहे. त्यादृष्टीने शहराच्या बाहेर तसेच शहरातील अनेक मोकळया जागांवर देखिल मोठया प्रमाणात पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे – (छाया -उमेश टोमके,पंढरपूर)

या सभेची पाहणी सेनेचे मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते,एकनाथ शिंदे खा. संजय राउत,सनिल देसाई,अरविंद सावंत आदी पदाधिकार्यांनी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सेनेनी सभेच्या तयारीची माहिती दिली. या वेळी रामदास कदम यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली. शिवसेनेनी आता राम मंदिर बांधण्याची भूमिका घेतली आहे. तसेच राज्यातील दुष्काळ बाबत देखील या पूर्वी सेनेनी मदतीचा हात दिला आहे. या प्रशि देखील पक्ष प्रमुख उध्व ठाकरे भूमिका मांडणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 7:32 pm

Web Title: ramdas kadam taking about ram mandir
Next Stories
1 बाला रफिक शेखला महाराष्ट्र केसरीचा किताब, अभिजित कटके उपविजेता
2 एकवेळ हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाहीत: गडकरी
3 सर्व धर्मांचा आदर राखण्याचे संस्कार आजाेबांनी केले – आदित्य ठाकरे
Just Now!
X