वेंगुर्ले येथील रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षांप्रमाणे श्री रामेश्वर कृपाप्रसादाने व सर्व भक्तमंडळींच्या सहकार्याने माघ शु. १, मंगळवार, ९ फेब्रुवारी ते माघ शु. ६, शनिवार, १३ फेब्रुवारीपर्यंत श्री गणेश जयंती, श्री देवी भगवती वर्धापनदिन, श्री देव नागनाथ व श्री शनिदेव वर्धापनदिन उत्सव साजरा होणार आहे.
त्यानिमित्त ९ रोजी उत्सवास प्रारंभ, श्री रामेश्वरावर लघुरुद्र व अभिषेक, १० रोजी शनिदेव वर्धापनदिन, सत्यनारायणाची महापूजा, नवचंडी देवता स्थापना व पाठवाचनास सुरुवात, ११ रोजी नागेश्वर वर्धापनदिन- वरदशंकर व्रतपूजा, श्री गणेश जयंती उत्सव-२१ पार्थिव गणपतींची स्थापना व त्यानंतर २१ गणेशयाग (हवन) पूर्णाहुतीसह, सायं. ४ पासून स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्रौ ७ वाजता वै. चांदेरकर महाराज शिष्यमंडळींचा हरिपाठ, १२ रोजी भगवती वर्धापनदिन उत्सव, नवचंडी हवनयुक्त, स. १० पासून कुंकुमार्चन, नवचंडी हवनाची पूर्णाहुती, सायं. ५.३० वा. गणपती विसर्जन, १३ रोजी १२ वा. बारापाच देवतांस महानैवेद्य, त्यानंतर आरती, गाऱ्हाणे व सर्व लोकांस महाप्रसाद देण्यात येईल. उत्सव कालावधीत रात्रौ ८ वा. तरंगदेवतांसहित श्रीगणेश, श्रीभगवती, श्रीनागनाथ, श्रीदत्त महाराज यांची भजनासहित पालखी मिरवणूक होईल. भाविकांनी सर्व श्रींच्या दर्शनाचा, कार्यक्रमांचा व उत्सव सांगतेच्या दिवशी होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.