सातारा जिल्ह्यातील आमदार रामराजे निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये नवा वाद उफाळून आला असून ‘रामराजे म्हणजे सातारा जिल्ह्याला लागलेली कीड आहे. फलटणमधील ही कीड आपल्याला घालवायची आहे’, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. उदयनराजे यांनी शनिवारी फलटण येथे एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले.

उदयनराजे जनतेला आवाहन करताना म्हणाले, आमदार असो वा खासदार, लबाडी मला अजिबात आवडत नाही. तुम्ही लोकांनी त्यांना मोठे केले आहे. तुम्ही धरसोड करता म्हणून ही लोकं मोठी होतात. लोकशाहीत कोणीही आमदार व खासदारकीला उभे राहू शकते. हिंमत असेल तर अजमावून बघा, असे आवाहन त्यांनी फलटणच्या जनतेला केले.

Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
wardha lok sabha marathi news
“केवळ सभेत दिसू नका, व्यक्तिगत नाराजी दूर ठेवा”, भाजप आमदारांना मिळाला सल्ला
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री
Rajabhau Waje
नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले

आपल्यावर बिनबुडाचे आरोप करून बदनाम करण्याचे काम सुरु आहे. हे अशोभनिय असून प्रत्येकाची सहनशीलता असते. माझी सहनशीलता आभाळाएवढी आहे. त्यामुळे हे सर्व मी सहन करीत आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचे आहे पण तत्पुर्वी कसे जगायचे व का जगायचे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हा विचार मी केला आहे, असे उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंच्या टीकेला उत्तर दिले असून, सकाळपासून रात्रीपर्यंत जे लिटरवर असतात त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. आम्ही विकासाची भाषा बोलतो, असभ्य भाषा बोलत नाही. ज्यांना कुणाला सातारचा खासदार व्हायचे असेल त्यांनी खुशाला व्हावे आमची श्रद्धा शरद पवार यांच्यावर आहे. मात्र, तुमची श्रद्धा कोणावर आहे ते सर्वांना माहीत आहे, अशी प्रतिक्रिया रामराजे यांनी दिली आहे.