News Flash

आज उपनगरात, उद्या शहरात विस्कळीत पाणीपुरवठा

राज्य वीज मंडळाच्या देखभाल-दुरुस्तीच्या भारनियमनामुळे उद्या (शनिवार) उपनगरांना आणि परवा (रविवार) शहराच्या मध्य भागास अपुरा व विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे.

| May 24, 2014 03:33 am

राज्य वीज मंडळाच्या देखभाल-दुरुस्तीच्या भारनियमनामुळे उद्या (शनिवार) उपनगरांना आणि परवा (रविवार) शहराच्या मध्य भागास अपुरा व विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे. महानगरपालिकेने तसे कळवले आहे. या पत्रकात मनपाने म्हटले आहे, की महावितरण कंपनी शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत विजेचे भारनियमन करणार आहे. त्यामुळे मुळा धरणावरील पाण्याचा उपसा या काळात बंद राहणार असून, पर्यायाने शहरातील पाण्याच्या टाक्या उद्या भरता येणार नाहीत. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी पूर्ण, सूर्यनगर, निर्मलनगर, स्टेशन रस्ता, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव या उपनगरांत आणि रविवारी शहराच्या मध्य भागात उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 3:33 am

Web Title: random water supply today in sub town and tomorrow in the city
टॅग : City
Next Stories
1 प्रशिक्षक अरीफ यांना आशा बॅडमिंटनलाही ‘अच्छे दिन आयेंगे’!
2 उपचार सुरू असताना जखमीचे निधन
3 सुपे एमआयडीसीसाठी लवकरच भूसंपादन- कवडे
Just Now!
X