News Flash

उद्धव ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर दानवेंचा ‘पटक देंगे’ विधानावर यू-टर्न

शिवसेनेला आपटणारा अजून जन्माला यायचा आहे असे खरमरीत प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिले होते.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा पटक देंगे हा इशारा शिवसेनेला नव्हे तर भाजपाच्या विरोधात उतरणाऱ्या विरोधकांना होता, असे म्हणत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यू-टर्न घेतला आहे. गेल्या आठवड्यात एका सभेत अमित शाह यांनी शिवसेनेशी युती झाली नाही तरी त्यांना आपटले जाईल असे सांगताना ‘पटक देंगे’ असा शब्दप्रयोग केला होता. त्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ शिवसेनेला आपटणारा अजून जन्माला यायचा आहे’ असे खरमरीत प्रत्युत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर आज अमित शाह यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता खासदार दानवे यांनी शिवसेनेकडून आलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पवित्रा बदलला. ‘तो इशारा शिवसेनेला नव्हता तर भाजपाच्या विरोधात उतरणाऱ्या विरोधकांना होता’ असे म्हणत यू-टर्न घेतला.

गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीनिमित्ताने मी राज्यातील मतदार संघाचा आढावा घेत आहे. आतापर्यंत ३६ लोकसभा मतदार संघात दौरा केला आहे. २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदार संघात एक प्रसारक नेमला आहे. संघटनेच्या बळावर पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी दिसतील इतकी आमची निवडणूक जिंकण्याची तयारी झाली आहे, असे दानवे म्हणाले.

भाजपाला हरवण्यासाठी काँग्रेसने राजकारण सुरू केलं आहे. काँग्रेसने कितीही आघाड्या केल्या तरी त्याचा काहीही राजकीय फायदा त्यांना होणार नाही. भाजपा संघटनेच्या बळावर निवडणूक जिंकेल. विविध योजना आणून आजवर भाजपाने फक्त विकास करून क्रांतिकारक बदल केला आहे’असे त्यांनी सांगितले.

मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे अशी आमची इच्छा आहे. युतीचा फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे असताना ठरला आहे. युतीची चर्चा राज्य पातळीवर व्हावी. जिथे जागांचा प्रश्न निर्माण होतो, त्या ठिकाणी केंद्र पातळीवर चर्चा व्हावी,असा तोडगा त्यांनी सुचवला. समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. निवडणुकांच्या जागेसंदर्भांत अद्याप शिवसेनेशी चर्चा झाली नाही, पण युतीबाबत आशावादी आहोत असं दानवे म्हणाले. याशिवा मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची अधिसुचना निघेल अशी शक्यता आज पुन्हा एकदा दानवे यांनी वर्तवली.

स्वतःची उमेदवारी जाहीर, इतरांबाबत मौन –
जालना लोकसभा मतदारसंघात मंत्री अर्जुन खोतकर आणि दानवे यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धावरून छेडले असता दानवे यांनी ‘ मीच रिंगणात असणार आहे. आतापर्यंत अनेकजण समोर आले आहेत. कोणीही पुढे आला तरी नीट करू’ असे सांगत त्यांनी आव्हान स्वीकारल्याचे सांगितले. याचवेळी कोल्हापूर ,सातारा मतदारसंघातील उमेदवारीबाबत विचारणा केली असता दानवे यांनी सगळे उमेदवार मार्च महिन्यात जाहीर करण्यात येईल , असे स्पष्टीकरण केले.

पत्रकार परिषद आटोपती –

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार होताच त्यांच्यावर पत्रकारपरिषद आटोपण्याची वेळ आली. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबतच इतर प्रश्न पत्रकारांनी विचारले, मात्र त्याला दानवे यांनी बगल दिली. एवढेच काय तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी देण्याची टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 2:51 pm

Web Title: raosaheb danve bjp talks about shivsena and alliance for loksabha 2019
Next Stories
1 गुप्तांगावर केमिकल प्रयोगाने पतीला मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
2 मलकापूरमध्ये ट्रकवर आदळली पोलिसांची कार; ४ ठार, ३ जखमी
3 18 वर्षांनी फेसबुकवर भेटला प्रियकर, भेटायला गेली असता केला बलात्कार
Just Now!
X