News Flash

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची निवड निश्चित

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी जालना मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते.

| January 2, 2015 07:13 am

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेसोबत युती करण्यावर काहीही विचार करण्यात आलेला नसून, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे दानवे यांनी सांगितले.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी जालना मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते. केंद्रात अन्न पुरवठा, ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्री असणाऱ्या दानवे यांच्यारूपाने मराठवाड्याला राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सध्या मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर प्रदेशाध्यक्षपदाची ही माळ रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. दानवे यांना ३० वर्षांच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असून ते भाजपच्या मराठवाड्यातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘मराठा तितुका मेळवावा!’ 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 7:13 am

Web Title: raosaheb danve choose as maharashtra bjp president soon
Next Stories
1 रायगडात लाचखोरीच्या २८  प्रकरणात ४३  जणांना अटक
2 सोनहिरा, केन अ‍ॅग्रो साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हा
3 बेमोसमी पावसाच्या पूर्वअंदाजाने द्राक्ष बागेवर प्लास्टिक आवरण
Just Now!
X