“महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,” असं विधान करत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनंही प्रत्युत्तर दिला आहे. “अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील” अशी टीका काँग्रेसनं भाजपावर केली आहे.

“महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,” असं विधान केंद्रीय कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केलं होतं. दानवे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. “अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील” असं म्हणत सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

काय म्हणाले होते दानवे?

“महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,” असं दानवे म्हणाले होते. तसंच बोलताना त्यांनी कृषी कायद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला होता. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांमुळे छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार असल्यानेच काँग्रेस या विधेयकांना विरोध करत असल्याचं ते म्हणाले होते. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन आमचं सरकार आल्यावर ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली होती. आता त्याचं सरकार आलं आहे, तर त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भररपाई द्यावी,” अशी मागणी देखील दानवे यांनी केली होती.

राष्ट्रवादीनं काय दिलं होतं उत्तर?

“रावसाहेब दानवे म्हणाले महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि करोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी,” असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवेंवर निशाणा साधला होता.