News Flash

मोदींविरोधात देशभरातले चोट्टे एक झाले आहेत, रावसाहेब दानवे पुन्हा वादात

रावसाहेब दानवेंची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी अडचणीत येणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं आहे. रावसाहेब दानवेंनी विरोधकांचा उल्लेख चोट्टे म्हणजेच चोर असा केला आहे. त्यांची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जालन्यात प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकास कामांच्या बैठकीत बोलताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी तुम्ही माझ्या मागे उभं राहण्यासाठी मी तुम्हाला पैसे देतो आणि त्यांना (विरोधकांना) पैसे भेटू नाही राहिले असंही वक्तव्य केलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये रावसाहेब दानवे उपस्थितांनी विचारताना दिसत आहेत की, मोदींना पंतप्रधान करणार का ?….पुढे ते म्हणतात की, ‘कोणी काहीही म्हणो काहीही सांगो…देशातले सगळे चोट्टे एक झाले आहेत आणि मोदींना होऊ नका सांगू लागले आहेत. आपल्याकडेही सगळे चोट्टे एकत्र झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडू असं म्हणू लागलेत. का तर मी मोदींजीचा माणूस आहे’.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे. ‘रावसाहेब दानवे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत हेच कळत नाही. रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आहे. आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरुनही पक्षाकडून त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नव्हती. या निवडणुकीत आम्ही त्यांना उत्तर देऊ’, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 11:30 am

Web Title: raosaheb danve controversial statement on opposition leaders
Next Stories
1 बारामतीचा गड राखण्यासाठी पवारांची प्रतिष्ठा पणाला!
2 पवार-विखे घराण्यातील संघर्ष वेगळ्या वळणावर
3 आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचा डाव!
Just Now!
X