दक्षिण सोलापूरचे माजी आमदार व विधान परिषदेसाठी कॉँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यासह पाचजणांविरुद्ध बलात्कारप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दोन कोटी रूपये न दिल्यास अश्लील फोटो समाजमाध्यमांवर टाकतो, अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे.

दिलीप ब्रह्मदेव माने (५२), निखिल नेताजी भोसले (३०), तृप्ती निखिल भोसले ( ३०), वेदमती नेताजी भोसले (४८), धनंजय भोसले (४५) अशी आरोपींची नावे आहेत. यातील निखिल भोसले याने पीडित महिलेशी विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख काढून मैत्री केली. त्यानंतर त्याने तुळजापूर मंदिरात खोटे लग्न करून या महिलेशी शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी त्याने पीडितेचे नग्नावस्थेतील फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकण्याची धमकी दिली.

delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
Rohit Pawar reacts on crab case says I will not stop until I crush corrupt people
“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

तसेच निखील याने दिलीप माने यांच्याकडे पाठवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवले नाही तर नग्न फोटो सर्वत्र पसरवतो, असे धमकावले, असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हे फोटो पसरवले आणि पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंताकिंदी करीत आहेत.

या आरोपात तथ्य नाही. तिने यापूर्वी अशाचप्रकारे चार-पाच जणांविरुद्ध खोटय़ा तक्रारी दिल्या होत्या.  मी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच ही तक्रार करण्यात आली, यामागे वेगळे कारण असावे. या संदर्भात आपण आपली बाजू न्यायालयात मांडू.

दिलीप माने