News Flash

सहा वर्षांच्या मुलीवर पंधरा वर्षीय मुलाचा अत्याचार

या प्रकरणी पोलिसांनी १५ वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

देशभरात मोठय़ा उत्साहात ७०वा स्वातंत्र्यदिवस मोठय़ा उत्साहात साजरा केला जात असताना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्यात सहा वर्षांच्या मुलीवर झालेल्या संतापजनक अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला. गेल्या दहा दिवसांत अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची जिल्ह्य़तील ही सलग दुसरी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी १५ वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

उस्मानाबाद शहरात एका पोलीस उपनिरीक्षकाने अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे या घृणास्पद प्रकाराची पुनरावृत्ती झाली. पंधरा वर्षांच्या मुलाने सहा वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग केल्याचा संतापजनक प्रकार १३ ऑगस्ट रोजी दुपारी घडला. मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर सोमवारी आरोपीला गजाआड करण्यात आले आहे.

दुपारी साडेबाराच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या घरी एकटीच खेळत होती. या संधीचा गरफायदा घेत गावातीलच १५ वर्षांच्या शाळकरी मुलाने तिला स्वत:च्या घरी नेले आणि त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. सहा वर्षांच्या मुलीला वेदना होऊ लागल्याने घडला प्रकार समोर आला. होत असलेला त्रास मुलीने आपल्या आईला सांगितला.

पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी सोमवारी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी शाळकरी मुलाला अटक करून त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 1:52 am

Web Title: rape case in osmanabad
Next Stories
1 अलिबाग- पेण रस्त्याची दुरवस्था
2 अलिबागमध्ये ‘मोहेंजोदारो’ अवतरले
3 सिंधुदुर्गात समाधानकारक पाऊस, धरणे भरली
Just Now!
X