News Flash

पाचगणीत ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

rape, crime against child, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, खून
प्रातिनिधिक छायाचित्र

पाचगणीतील उच्चभ्रू सोसायटीतील एका बंद बंगल्यात आठ वर्षांच्या  मुलीवर बलात्कार करून तिचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून टाकी बंद केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रविवारी दुपारी खेळताना बेपत्ता झाली होती. त्यादिवशी रात्री पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित मुलीचे वडील याच सोसायटीत माळी काम करतात आणि तेथेच राहतात. मुलगी खेळत असताना तिचे अपहरण करून तिच्यावर बंद बंगल्यात बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. सोमवारी रात्री बंगल्यातील पाण्याच्या टाकीतून मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाचगणीतील सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2016 1:15 pm

Web Title: rape murder of a minor girl in pachgani
Next Stories
1 ‘ईपीएफ’ कर लावण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मागे, विरोधामुळे अर्थमंत्र्यांची माघार
2 डंपर चालकांसाठी राणे आक्रमक
3 डम्पर आंदोलनातून सेना-भाजपची माघार
Just Now!
X